Ahmednagar News : तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रपच उभे करणाऱ्या स्व. बापूंना अनेकांनी राजकीय त्रास दिला आहे. मात्र आता येथून पुढे तो सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप माणूस नागवडे कुटुंबासोबत आहे.
राजकारणात नागवडे कुटुंबाला त्रास देणाऱ्या सगळ्यांचा हिशोब चुकता करणार असून आरेला कारेची भाषा सुनावली जाईल अशा इशारा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी दिला.
शुक्रवारी ढोकराई फाटा येथे राजेंद्र नागवडे यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी, अनुराधा नागवडे आणि बाळासाहेब नहाटा यांची जिल्हाध्यक्ष म्हणून तर राज्य पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी दत्ता पानसरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तालुक्याच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते कांताआप्पा लकडे होते.
राजेंद्र नागवडे म्हणाले कि, तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही रात्रदिवस संघर्ष करतोय, श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तर नाहाटा म्हणाले, राज्य पणन महामंडळाच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आणि ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
यासर्व घडामोडी मध्ये राजेंद्र नागवडे यांचा मोठा हात आहे. तालुक्याच्या राजकारणात काम करताना प्रामाणिक काम केले येणाऱ्या काळात राज्य फेडरेशनच्या माध्यमातून तालुक्यासाठी जास्तीत जास्त काम करणार असल्याचे दत्तात्रय पानसरे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला लेबर फेडरेशनचे अनिल पाचपुते, जिल्हाउपाध्यक्ष राकेश पाचपुते तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे, योगेश भोयटे, बंडू जगताप, प्रकाश उंडे, धर्मनाथ काकडे, मारूती पाचपुते, नागवडे कारखान्याचे सर्व संचालक याच्यासह मान्यवर हजर होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्रस्ताविक सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी तर सुभाष शिंदे यांनी आभार मानले.