तपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव द्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-सावेडी उपनगरातील महत्वपूर्ण रस्ता असणार्‍या तपोवन रस्त्याला भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य लोकनेते स्व.दिगंबर महाराज ढवण यांचे नाव देण्यात यावे,

अशा मागणीचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले. याप्रसंगी ऋषीकेश ढवण, निशांत दातीर, कैलास गर्जे, दत्ता हजारे, सागर पोळ, सचिन खाटेकर आदि उपस्थित होते.

स्व.दिगंबर ढवण यांच्या दशक्रिया विधीनंतर आयोजित शोकसभेत शिवसेनेचे भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी सभापती सचिन जाधव,

भाजपचे जिल्हा कार्यकारिणीचे बाबासाहेब सानप, विशाल नाकाडे, अनिल बोरुडे, आनंद लहामगे, स्वप्नील दगडे यांनी वरिल मागणी केली होती. याबाबतचे निवेदन आज महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे,

तरी यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. स्व. दिगंबर ढवण यांनी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्याच्या कामासाठी तब्बल 43 वेळा पत्रव्यवहार केला.

अनेक अभिनव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. दुर्दैवाने त्यांचा अंत झाल्याने त्यांचे कार्य पुढील पिढीला स्मरणात रहावे, या हेतूने या रस्त्याला ढवण यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24