अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-शहरातील तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे, जालिंदर उल्हारे, संतोष जगताप, कैलास साळवे, सागर साळवे, लहुजी शक्ती सेनेचे सुनील सकट, भारतीय लहुजी सेनेचे साहेबराव काते, साजिद बेग, हॅपी भांबळ, ज्ञानदेव भैलुमे,
अजित गायकवाड आदी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील तमाम अपेक्षित घटकांचे विद्यापीठ होते. या थोर साहित्यकांचे शहरातील तारकपूर बस स्थानकाला नांव असणे भूषणावह ठरणार आहे. अण्णाभाऊ साठे यांनी अहमदनगरमध्ये सर्जेपुरा रंगभवन येथे शाहिरीचा कार्यक्रम केला होता.
शहराजवळच अकोळनेर येथे अण्णाभाऊ साठे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी आले होते. त्यांच्याशी शहराचे भावनिक नाते निर्माण झालेले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय, दलित, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार व साहित्यिकांची तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची इच्छा आहे.
तरी तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.