अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- भारत सरकारच्या नीति आयोग तसेच अखिल भारतीय स्वयंचलित तंत्रशिक्षण व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना भारत सरकारच्या कार्पोरेट,सांख्यिकी व नियोजन मंत्रालयाचे केंद्रीय तथा राज्यमंत्री श्री राव इन्द्रजीतसिंह यांच्या शुभहस्ते माहिती तंत्रज्ञान(आयसीटी)क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला.
गौरवचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून या सोहळ्यासाठी टोबी बासफोर्ड(संचालक,व्हीपी पिपल व कल्चर क्लाऊड क्लब फॅक्टरी,इंग्लंड),राजेशकुमार पाठक(सचिव, प्रौद्योगिकी विकास बोर्ड),एस.एन.त्रिपाठी (महानिदेशक,भारतीय लोक प्रशासन संस्था),प्रो.के.विजय राघवन(वैज्ञानिक सल्लागार,भारत सरकार),अजय प्रकाश सुहाणी(सचिव,इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय),डॉ.बि.के.सारस्वत(सदस्य,निती आयोग),प्रो.अनिल सहस्त्रबुद्धे(चेअरमन,एआयसीटीई)आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
“संपूर्ण जग कोरोना प्रतिकूलतेचा सामना करत असताना देशाच्या विविध भागातील आयटी व आयसीटी तंत्रज्ञ,तंत्रस्नेही शिक्षक,ऑनलाइन कंटेंट क्रिएटर यांनी जगाचे रहाटगाडगे चालू ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर डॉ.बागुल यांचे योगदान अतुलनीय आहे असे वाटते.काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेणारा भारतीय सतत पुढे जात राहील आणि हीच काळाची गरज आहे.चंद्र-मंगळावर आपण ज्या वसाहती निर्माण करण्याचे स्वप्न पाहत आहोत,त्याची ही टेक्नॉलॉजिकल सुरुवात आहे. या दृष्टीने प्रत्येक भारतीयाने तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.”असे प्रतिपादन मंत्री श्री इन्द्रजीत सिंह यांनी केले.
ऑनलाइन परीक्षणातून व हजारो जागतिक आयटी व आयसीटी तंत्रज्ञांच्या मुलाखतीतून डॉ.बागुल यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.कार्यक्रमस्थळी डॉ.बागुल यांच्या कामाचे सादरीकरण देखील संपन्न झाले.२५मार्च २०२० पासून कोरोना लॉकडाऊन मध्ये गुढीपाडव्यापासून डॉ. बागूल यांनी सुरू केलेल्या ई-लोक शिक्षा अभियानास २५ सप्टेंबर २०२१ रोजी ५४० दिवस पूर्ण झाले आहेत.यामध्ये सुमारे ९४ देशातील २५ लाखांपेक्षा अधिक शिक्षक,पालक,विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
“ई”म्हणजे इंटरनेटचा वापर करून सामान्य नागरिकांना “लोकांना” विविध सोशल मिडियाच्या ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, संगणकीय स्तरावरील प्रशिक्षणे, सेमिनार,अभ्यासक्रम यांची माहिती ऑनलाइन पाठवण्याच्या उपक्रमाला डॉ. बागुल यांनी ई-लोक शिक्षा अभियान असे नाव दिले आहे. यामध्ये देशातील पहिलाच प्रयोग असलेल्या राष्ट्राचे शिल्पकार, ई माहिती दूत,आय.सी.टी.बॉस, मान्सून/समर आर्ट कॅम्प आणि स्टडी फ्रॉम होम पॅटर्न या विविध संकल्पनांचा समावेश आहे.
हा उपक्रम मोफत असून कुठलेही शुल्क आकारले जात नाही.डॉ.बागूल यांना या उपक्रमासाठी स्वखर्चातून दररोज सुमारे २० जीबी डेटा लागतो तसेच बागुल दररोज साधारणत: १५ तास काम या उपक्रमांवर करतात.सुमारे ९५०० पेक्षा जास्त व्हाट्सअप ग्रुप तयार करून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या पाच माध्यमातून दररोजचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाठवला जातो. कोरोनाची व्याप्ती लक्षात घेऊन डॉ.बागुल यांनी या उपक्रमाचे जम्बो वेळापत्रक तयार केले आहे. यानुसार विविध विषयांचे आदल्या दिवशी नियोजन करून अनेक मोबाईलच्या माध्यमातून मेसेजेस मोफत पाठवले जातात.वेबसाईट,ॲप,ब्लॉग,सॉफ्टवेअर यांची देखील बागुल यांनी निर्मिती केली आहे.
डॉ.बागूल यांचे या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल श्री धर्मेंद्र प्रधान(शिक्षण मंत्री,भारत सरकार),श्रीमती अन्नपूर्णा देवी,डॉ.सुभास सरकार,डॉ.राजकुमार रंजन सिंग(सर्वश्री कॅबिनेट राज्यमंत्री,शिक्षण मंत्रालय,भारत सरकार),मा वर्षाताई गायकवाड(शिक्षण मंत्री,महाराष्ट्र),मा.उदय सामंत(उच्च व तंत्र शिक्षण मंत्री),मा.ओम प्रकाश कडू(राज्यमंत्री),श्रीमती वंदना कृष्णा(शिक्षण सचिव),मा.विशाल सोळंकी(शिक्षण आयुक्त),मा.राहुल द्विवेदी(प्रकल्प संचालक,समग्र शिक्षा अभियान),
देवेंद्र सिंह(संचालक,एससीईआरटी),दिनकर टेमकर(शिक्षण संचालक),दिनकर पाटील,(अध्यक्ष,मरामाउमाशि मंडळ),मा रमाकांत काठमोरे,(शिक्षण सहसंचालक तथा उपसंचालक),जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील,अशोक कडूस,(शिक्षणाधिकारी,माध्य),शिवाजी शिंदे(शिक्षणाधिकारी प्राथ.),सुभाष पवार(प्रशासनाधिकारी,मनपा शिक्षण मंडळ), श्री. समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,ॲड.किशोर देशपांडे(शालेय समिती चेअरमन) आदी मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या आहेत.