‘या’ कारणास्तव कळसूबाई गडावरील नवरात्रोत्सव रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सण उत्सवावर कोरोनाचे सावट कायम आहे.

यातच नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. अकोले तालुक्यातील बारी येथील ग्रामस्थ व कळसूबाई देवस्थान ट्रस्टने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवरात्र उत्सव रद्द करण्यात आल्याने पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नवरात्र उत्सव ७ ऑक्टोबर रोजी असून,

विजयादशमी १५ ऑक्टोबरला असून या कालावधीत पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी करण्यात आल्याचा निर्णय आज रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे,

भीमराज अवसरकर यांनी दिली आहे. दरम्यान कळसूबाई शिखरावर दरवर्षी एक लाख भाविक येतात त्यांचे नियोजन करणे प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. सरकारने याबाबत काही निर्बंध लादले असून त्यात देवळात जाता येणार नाही.