मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कालपासून नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा येथे शारदीय नवरात्र उत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ होऊन घटस्थापना करण्यात आली.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देवस्थाने बंद असल्याने येथेही देवस्थानाच्या मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असून मंदिराच्या आत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोहटा देवीच्या पायरीवर डोके टेकून माघारी फिरले. शनिवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिलारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिलारे

यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेला विश्वस्त अशोक दहिफळे, अशोक भाऊ दहिफळे, भीमराव पालवे, आदिनाथ आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे, सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते.

दुपारनंतर प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, पाथर्डीचे न्यायाधीश शरद देशमुख, ॲड.विजय वेलदे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे आदींनी भेट देऊन पाहणी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24