वर्षभरातील एक काम दाखवा. मी माझी सर्व कामे दाखवतो, आमदार लंके यांना झावरे यांचे आव्हान !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील पळसपूर येथे झावरे यांच्या पुढाकारातून बांधण्यात आलेल्या गव्हाळी बंधाऱ्याचे जलपूजन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी बोलताना सुजित झावरे यांनी राज्य सरकारसह आमदार लंके यांच्यावर टीका केली.

बाजार समितीचे संचालक खंडू भाईक, मोहन रोकडे, सरपंच माधवराव पवार, सिताराम पवार, भास्करराव ढोले, गणपतराव पवार, हनुमंत पवार, सुदाम गाजरे, बी. व्ही. आहेर, संजय आहेर, धोंडीभाऊ डोंगरे, विठ्ठल डोंगरे, पोपटराव पवार,

रामदास ढोले, संतोष डोंगरे, भाऊसाहेब पवार आदी यावेळी उपस्थित होते. झावरे म्हणालेे, राज्यात तुमचे वजन आहे म्हणता मग ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे राहिले आहेत, त्याचे पंचनामे करा.

ज्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना भरपाई देण्यास सांगा. कुठेही गेले की सांगतात आजही माझ्या हातात ‘मातोश्री’चा धागा आहे. दुसरीकडे गेले तर त्यांची भुमिका वेगळीच असते.

तुमचे वजन असेल, ते वापरून शेतकऱ्यांना मदत मिळाली तर मी तुमचे कौतूक करील, अशी कोपरखळीही झावरे यांनी आमदार लंके यांना नाव न घेता मारली.

मी वर्षभरात नऊ बंधारे बांधले. आधी केले मग सांगितले. तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्याचे काम कोणतीही महत्त्वाकांक्षा डोळयापुढे ठेवून मी काम करीत नाही.

दुसरीकडे गेल्या वर्षभरातील लोकप्रतिनिधींचे एक काम दाखवा. मी माझी सर्व कामे दाखवतो, असे आव्हान झावरे यांनी आमदार लंके यांना दिले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24