अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यात नगर जिल्ह्यात 12 केंद्रांवर लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी 871 जणांनी लस टोचून घेतली.
त्यापैकी तीन परिचरिकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. महापालिका रुग्णालयातील दोघींचा व जिल्हा रुग्णालयातील एकीचा त्यात समावेश आहे.
काल दुपारी लस घेतल्यानंतर रात्री उशिरा दोघींना, तर आज सकाळी एकीला त्रास सुरू झाला. थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे, असा त्रास त्यांना होऊ लागला.
त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशी ८७१ जणांनी उपस्थित राहून लस टोचून घेतली.
लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास केंद्रावर ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले. लस घेतलेल्यांपैकी दोघींना रात्री तर एकीला सकाळी त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले.