लसीकरणावरून महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तु तू में में

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यातच सध्या अनेक ठिकाणी लसीकरांचा तुटवडा जाणवत असल्याने काही लसीकरण केंद्रावरील लसीकरांनाची प्रक्रिया ठप्प होत आहे.

दरम्यान आता याच मुद्द्यावरून राजकीय पक्षांमधील नेत्यांमध्ये वाद निर्माण होत आहे. महापालिकेच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयातून कोराेनावरील लसींचे वितरण केले जाते.

लस उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या मनपा कार्यालयात लोकप्रतिनिधींची वर्दळ असते. शुक्रवारी सेनेचे एक ज्येष्ठ नेते लसीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेले असता, तिथे राष्ट्रवादीचे नेते आले.

अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते. यावेळी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता.

कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांची एक कुमक जुन्या मनपा कार्यालयात दाखल झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात खुर्च्यांची तोडफोड करत बाटल्या फोडल्याचा दावा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून जुन्या महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. दरम्यान या घटनेचा दोन्ही पक्षांकडून इन्कार करण्यात आला. मात्र या सदर घटनेची शहरात जोरदार चर्चा होती…

अहमदनगर लाईव्ह 24