राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द -आ.संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर सचिवपदी सुफीयान शेख, शहर उपाध्यक्षपदी मिजान कुरेशी व वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

नुतन पदाधिकार्‍यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार,

युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, शाहनवाझ शेख, ताज खान, अन्सार सय्यद, शहेजाद खान, फईम इनामदार आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द आहे. युवकांना पक्षात काम करण्यास संधी देत असल्याने एक प्रकारे आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे.

शहरासह जिल्हा पातळीवर काम करण्यासाठी युवक राष्ट्रवादीशी जोडला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी नुतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा देऊन

अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले. साहेबान जहागीरदार यांनी नुतन पदाधिकार्‍यांचा विविध उपक्रमाच्या माध्यमातून सुरु असलेले सामाजिक कार्य,

अल्पसंख्यांक समाजातील युवकांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क व काम करण्याची तळमळ पाहून त्यांना अल्पसंख्यांक शहर विभागाचे पद देऊन महत्त्वाची जबाबदारी सोपविली असल्याचे सांगितले.

अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्‍न शासनस्तरवार सोडविण्यासाठी व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करुन पक्ष संघटन करणार असल्याचे नुतन पदाधिकार्‍यांनी भावना व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24