अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जगप्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना आज राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल झाला आहे.
याबद्दल प्रभाग पाच व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने अंबिका माता मंदिर येथे महाआरती, पेढे वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी प्रभाग पाचचे प्रमुख विकी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. याचबरोबर देवीची विधीवत पूजा-अर्चा करून महाआरती करून पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, श्री.शेळके, अरुण गोसावी, विजय धाडिवाल, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, गणेश लकारे, मुकुंद भुतडा, महेश उदावंत, ऋषीकेश खैरनार, ओम दुसाने, ओम बोराडे, वामन गोसावी,
प्रताप गोसावी, तन्मय गायकवाड, डॉ. समीर शाह, भालचंद्र गायकवाड, संजय ठाकूर, मनोज नरोडे, धनंजय कहार, दादा हलवाई, अरुण जोशी, संदीप देवळालीकर, राहुल आदमाने, दीपक कराळे,
शुभम गायकवाड, मुन्ना पठाण, निखील तांबे, अनिस शाह, प्रसाद रुईकर, रोहित खंडागळे, योगेश जोशी, फरदिन बेग, अभिषेक गायकवाड, श्याम मापारी, नंदन वाघमारे, उषा गायकवाड, संतोष ठाकूर, श्रीकांत नरोडे आदी उपस्थित होते.