अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सबाजीराव गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून पहिलाच अर्ज भरला आहे गायकवाड यांनी बिगरशेती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सबाजीराव गायकवाड हे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष असून जिल्ह्यातील पतसंस्था पदाधिका-यांशी त्यांचा थेट सबंध आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत थोरात, विखे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवून तगडी झुंज दिली.
त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. पतसंस्था तसेच मजूर फेडरेशन च्या माध्यमातून गायकवाड जिल्हाभरातील मतदारांशी थेट संपर्क आहे.
बिगरशेती मतदारसंघात आपल्या चळवळीतील संचालक असावा अशी या मतदारसंघातील मतदारांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे गायकवाड यांच्या उमेदवारीस जिल्हाभरातून पाठबळ मिळत आहे.