अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-देशभऱ ख्याती असलेले शिर्डी येथील साईमंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र संस्थांनातील एक हलगर्जीपणाचा कारभार नुकताच उघड्यावर आला आहे.
साई संस्थान दरवर्षी भाविकांच्या सुविधेसाठी दिनदर्शिका व डायरी व बाबांचे फोटोचे कॅलेंडर छापून भाविकांना अल्पदरात उपलब्ध करून देत असते.
मात्र यावर्षी डायर्या व कॅलेंडर मिळाल्या नसल्याने देश विदेशातील अनेक भाविकांनी साई संस्थांनकडे तक्रारी केल्या. या सर्व वस्तू प्रकाशन विभागाकडून ऑर्डरप्रमाणे मागविल्या जातात.
मात्र प्रकाशन विभागाचे अधीक्षक तिलक बागवे यांनी आपल्या कामात हलगर्जी केल्यामुळे साई संस्थानला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
2021 ची दिनदर्शिका व डायरी अजूनही प्रिंट झाल्या नसल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.आपल्या दैनंदिन कारभाराचा हिशेब हा बाबांच्या नगरीतील डायरीमध्ये असावा या श्रद्धेतून देश विदेशातील अनेक भाविक त्या डिसेंबर महिन्यात खरेदी करून नवीन वर्षाची भेट म्हणून ते आपले नातेवाईक व मित्रांना देत असतात.
मात्र ज्यांच्याकडे ह्या सर्वांची जबाबदारी होती असे बागवे यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केल्याचे आढळून आल्याने साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी रीतसर चौकशी करून या प्रकरणाचे गांभीर्य घेऊन जबाबदार असणारे अधीक्षक बागवे यांना अखेर निलंबनाची कारवाई केली आहे.