पुरवठा विभागाचा हलगर्जीपणा; ग्राहकांना मिळणाऱ्या धान्यात आढळल्या लेंड्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-ऐन सणासुदीच्या काळात शासनाने नागरिकांसाठी सरकारी धान्य दुकानात गहू, तांदूळ, हरभरा डाळ व साखर पाठविली आहे. यामध्ये तांदूळ अत्यंत खराब असून गहू व उंदराच्या लेंड्यासह इतरही घाण आहे.

हा तांदूळ काळाकुट्ट असून अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. हा नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. सदर धान्य अजिबात खाण्यायोग्य नाही.

अशाच प्रकारे गव्हाच्या काही कट्ट्यांमध्ये भेसळ आढळून आल्याने संबंधित दुकानदारांनी गहू व तांदळाचे ते कट्टे बाजूला काढून ठेऊन त्याचे वाटप केले नाही.

ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारमान्य रास्तभाव धान्य दुकानावर निकृष्ट दर्जाचे धान्य आल्याने देवळाली प्रवरा येथील नागरिकांनी शासकीय यंत्रणेविरूद्ध संताप व्यक्त केला आहे.

याबाबत तालुका पुरवठा विभागाने ऐन सणासुदीच्या काळात धान्य वितरणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असताना त्यांच्या हलगर्जीपणामुळेच निकृष्ट दर्जाचे धान्य वाटपासाठी पाठविण्यात आले.

यापूर्वीही असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. परंतु तालुका पुरवठा विभाग या गोष्टी गांभिर्याने कधीच घेत नसल्याने असे प्रकार वारंवार होत आहेत.

याबाबत तहसीलदार राहुरी यांनी गांभिर्याने दखल घेऊन निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणार्‍या अधिकार्‍यावर तातडीने कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24