अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नेवासे फाटा परिसर तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. सदर रुग्ण मुंबई येथून नेवासे फाटा येथे आला होता. त्यामुळे तो राहत असलेला साराच परिसर शनिवारपासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.
सदर व्यक्तीला २९ जून रोजी त्रास होऊ लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ जुलैला त्याचा स्त्राव घेण्यात आला होता. शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालातून त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
तब्बल ३३ दिवस नेवासे कोरोनामुक्त राहिल्यानंतर हा आठवा रुग्ण सापडला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी आरोग्य विभागाने सुरू करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना क्करंटाईन करण्यात आले.
त्यातील हाय रिस्क सात व लो रिस्क तीन असे वर्गीकरण करून हायरिस्क संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवल्याचे डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews