उसासाठी ओळख असणारा नेवासा बनलाय कापूस उत्पादक तालुका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- ऊस उत्पादक तालुका अशी ओळख असणारा नेवासा तालुका आपली कात टाकत आहे. आता या तालुक्याने आणखी एक नवीन ओळख निर्माण केली आहे.

यंदा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता तो राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत गेला असल्याचे परिपत्रक पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे.

त्यामुळे आता राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांची संख्या 122 झाली आहे. मुळा-प्रवरा-गोदावरी नद्यांच्या परीरस्पर्शात वसलेल्या नेवाश्याने यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली.

लोकनेते मारूतराव घुले पाटील (ज्ञानेश्वर) आणि मुळा सहकारी साखर कारखान्यांनी या भागाला बहर आणला. पण आता काही शेतकरी ऊसाऐवजी कापसाच्या पिकाकडे वळले आहेत.

नगदी आणि कमी पाण्यात येणारे पीक म्हणून तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी कापसाच्या उत्पादनाकडे वळला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक तालुका अशी ओळख असणारा नेवासा तालुका आता कापूस उत्पादकांच्या यादीत गेला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24