अहमदनगर बातम्या

तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ‘या’ पोलीस ठाण्यात झाले नवीन बदल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्यात डी. बी. पथक स्थापन केले आहे. दरम्यान नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलीस ठाण्यात हे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.

डी. बी. पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढणार असून येणार्‍या काही दिवसांत तालुका गुन्हेगारी मुक्त करू. असा विश्वास पोवार यांनी व्यक्त केला.

यावर बोलताना पोवार म्हणाले कि, डी. बी पथकाच्या माध्यमातून गावठी कट्टे, गुटखा, मावा, मटका, सट्टेबाजी, गोमांस , वेश्या व्यवसाय, बिंगो, रेशन तस्करी, गांजा तस्करी, रस्ता लूट, जबरी चोर्‍या, मोटरसायकल चोरी, हायवेवर होणार्‍या रस्ता लुटीचें प्रकार,

अवैध दारू, बनावट दारू बनवणारे रॅकेट, गारगोटी, जमिनी ताबा, डिझेल चोरी, भुरट्या चोर्‍या आदि गोष्टीवर कारवाई करणार आहे.

पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी डीबी स्क्वॉड काम करत असते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची कुठे उठबैस आहे, त्यांचे मित्र,

कुटुंबाविषयक माहिती, फोटो यासह त्यांची माहिती तयार करून हद्दीत चांगले खबरी तयार करण्याचे काम या पथकामार्फत अपेक्षित असते यासह अश्या अनेक गोष्टीवर कारवाई साठी पथकाची मोहीम सुरू राहणार असल्याचे यावेळी पोवार यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office