अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासोबत उभं राहिलंय नवे संकट ! या नव्या आजाराची साथ पसरली…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे. यामुळे सामान्य जनता अगोदरच चिंतेत सापडली आहे. त्यातच ‘सारी’या आजारानेही संकटही अधिक गडद झाले आहे.

या आजाराचे १२ रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात आढळले आहेत. ११ जणांवर घरीच, तर एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या पाठोपाठ सारीचेही रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

धक्कादायक म्हणजे या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहेत. सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना सारीच्या रुग्णांचीही माहिती सदर करण्याचे आदेश दिले आहेत.

सारी या आजाराची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासारखीच आहेत. या आजारात दोन दिवसांतच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते, त्यात त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.

सारीच्या रुग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे दिसतात, यात रुग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते.

ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे असा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे. त्यामुळे सारीचा रुग्ण हा कोरोनाही असू शकतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24