अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिकाहदीतीन एकल (stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी भागात एखाद्या गल्लीत / रस्त्यालगत पाच पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूची विक्री करणारीच दुकाने सुरु राहतील, असे आदेश जारी केले होते.
त्या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे. अर्थात, नागरी क्षेत्रातील सर्व मॉल्स आणि आठवडी बाजार हे पुर्णतः बंद राहतील. नागरी क्षेत्रातील बाजारपेठ व व्यापारी संकुलातील फक्त जीवनावश्यक वस्तु विक्रीची दुकाने सुर राहतील.
सर्व दुकानांचे ठिकाणी मास्क व सेनिटायझर्स वापरणे अनिवार्य आहे. सर्व दुकानांचे ठिकाणी सामाजिक अंतर (Social dislancing) पालन होईल, याबाबत त्याठिकाणांचे प्रभारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. सर्व दुकनांचे ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, सार्वजनिक ठिकाणी व दकानांचे ठिकाणी मास्क न वापरणारे व थुंकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करावी.
संबंधित स्थानिक प्राधिकरणाने सर्थ दुकानामध्ये समाजिक अंतर (Social distance) पालन होत नसल्यास, दुकानासमोर अनावश्यक गर्दी दिसुन आल्यास सदर दुकान सील करावे. तसेच सदर आस्थापना प्रमुखावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणतौही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मथील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®