अहमदनगर बातम्या

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच राहाता तालुक्यासाठी नवीन नियमावली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- राहाता तालुक्यात 350 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर बंधने घातली आहेत. रातालुका प्रशासनाने करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत.

तसेच राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी संपूर्ण राहाता तालुक्याला नवीन नियमावली लागु केली आहे. जाणून घ्या काय असणार आहे नवीन बदल… भाजीपाला बाजार बंद असणार असून लसीकरण केलेल्या विक्रेत्यामार्फत हातगाडी अथवा इतर साधनांद्वारे घरपोच विक्री व्यवस्था करण्यात यावी.

धार्मिक स्थळे यांच्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांची चाचणी केलेली असावी, डोस घेतलेले असावे. खाजगी दवाखाने, लॅब, एचआरसीटी केंद्र, मेडिकल स्टोअर यांनी करोना सदृश्य व्यक्ती बाबतची माहिती नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देणे बंधनकारक आहे.

जनावरांचा बाजार व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तु विक्री दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप, गॅस सिलेंडर एजन्सी, इतर अस्थापनामध्ये काम करणार्‍या मालक नोकर यांचे लसीकरण तात्काळ करण्यात यावे.

तसेच यांची आरटीपीसीआर अथवा रॅट टेस्ट निगेटिव्ह अहवाल असेल तरच काम करण्याची परवानगी द्यावी. दर 15 दिवसांनी चाचणी करुन घ्यावी.

शासकीय कार्यालयात करोनाच्या आरटीआरटीपीसीआर अथवा रॅट टेस्ट निगेटिव्ह अहवाल अथवा दोन्ही डोस पूर्ण झाले असेल तरच त्यांना प्रवेश द्यावा.

कंटेन्मेंट झोन जाहिर झालेल्या ठिकाणी मेडिकल दुकाने, दवाखाने वगळता इतर सर्व अस्थापना बंद असतील. व्यवहार बंद असतील.कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office