अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- बहुतांश राजकारणी मंडळी राजकीय पद स्वीकारण्याआधी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण व पूजन करतात. काहीजण मंत्रोच्चारात पदग्रहण करतात.
महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकरही या भावभक्तीला अपवाद ठरले नाहीत. सिद्धपुरुष शंकर महाराज यांच्या प्रतिमेला त्यांनी आधी सभापतीपदाच्या खुर्चीत विराजमान केले,
त्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली व त्यानंतर दुसऱ्या खुर्चीत बसून त्यांनी सभापतीपदाचा पदभार घेतला. दरम्यान, महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी निम्मे सदस्य दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस निवृत्त होतात
व त्यांच्या जागी नवे सदस्य नियुक्त झाल्यावर नव्या सभापतीपदाची निवड होते. या पार्श्वभूमीवर, नव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे.
‘मात्र, पहिल्या बहुजन समाज पक्षाच्या सभापतीने १९ महिन्यांचा कार्यकाळ उपभोगल्यावर आम्हालाच चार महिने कसे, असा सवाल कोतकर समर्थकांतून होत असून, बघू येत्या जानेवारी-फेब्रवारीत काय करायचे ते’, अशा सूचक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved