अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात ७ कोरोना रुग्ण नव्याने आढळून आले. यात बेलापूर, गळनिंब, अशोकनगर,
भोकर, श्रीरामपूर शहरातील रेव्ह्युनी कॉलनी येथे प्रत्येकी एक तर वॉर्ड नं. 7 या ठिकाणी दोन रुग्ण आढळले. आता तालुक्यात 72 पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत.
यातील 15 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर काल 23 लोकांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. आतापर्यंत 521 जणांचे स्त्राव तपासण्यात आले असून
यात 72 पॉझिटिव्ह तर 294 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 145 अहवालांची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत तालुक्यात तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com