अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे सहा महिन्यापूर्वी विवाह झालेल्या २० वर्षीय नवविवाहितेने घरघुती वादाच्या घराजवळीरल शेततळ्यात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील चिंचविहिरे येथिल सौ योगिता गौतम नरोडे, या २० वर्षीय नवविवाहितेने घरात झालेल्या वादातून आत्महत्या केली.
याबाबत राहुरी पोलिसात मयताचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले, (वय वर्ष ४९, ग. कोल्हार भगवती, ता. राहाता) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
मयत अश्विनी व तिचा पती गौतम यांचे यांचे सहा महिन्यापूर्वी लव्हमॅरेज विवाह झाला आहे. आश्विनी ही गोतमच्या मामाची मुलगी असल्याने या दोघांचा विवाह नातेवाईकांनी कोरोनाच्या कार्य काळात सहा महिन्यापूर्वी सोशल डिस्टंन्सिंग ठेवुन लावून दिला होता.
दुपारी उशीरा पर्यंत आश्विनीच्या शवविच्छेदनाचे काम सुरु होते. घटनेच्या ठिकाणी पोलिस हवालदार डि.के. आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, शिवसेनेचे सुरेश लांबे, सुधीर झांबरे आदि उपस्थित होते.
आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलीचे वडिल अरुण मिजगुले व चुलते नंदु मिजगुलेसह नातेवाईकांकडुन केली जात आहे.