संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक शिवारातील विनायक एकनाथ जऱ्हाड यांच्या गट नं. ३२० मध्ये असलेल्या विहिरीत सोमवारी सकाळी मृत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. या मृत बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
याबाबत समजलेली माहिती अशी, आश्वी बुद्रुक शिवारात विनायक जऱ्हाड यांची आश्वी-मांची रस्त्यावर गट नं. ३२० मध्ये शेतजमीन आहे. सोमवारी सकाळी काही महिला जनावरांना गवत घेण्यासाठी तेथे गेल्या होत्या.
त्यावेळी उग्र वास आल्याने या महिलांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत मृत बिबट्या दिसला. त्यामुळे बिबट्या पडल्याची माहिती मिळताच विनायक जऱ्हाड यांनी वनविभाला संपर्क करून याविषयी माहिती दिली.