राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या वांबोरी येथील केंद्रावर पाच दिवसांच्या बंदनंतर काल कांद्याच्या मोंढ्यावर ३ हजार ३४७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ३५०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ३ हजार ते ३५०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्यास २ हजार २०० ते २ हजार ९७५, तीन नंबर कांद्यास ३०० ते २ हजार १७५ रुपये तर गोल्टी कांद्यास २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.