साईराम सामाजिक सोसायटीने 150 गरजू कुटुंबीयांची स्विकारली जबाबदारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या नगर कल्याण रोड येथील 150 गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तर लॉक डाऊन उघडेपर्यंत साईराम सामाजिक सोसायटीने या गरजू कुटुंबीयांची जबाबदारी स्विकारली आहे.

कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. या संकट काळात कोणीही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे गरजूंना घरपोच वाटप करण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, सचिव सोमनाथ बोर्‍हाडे, दत्तात्रय पारखे, श्रीपाद वाघमारे, मच्छिंद्र चौकटे, दिनेश शिंदे, राजू पंचमुख, उमेश क्षिरसागर, सचिन दिवाणे, अक्षय भागवत, अतुल मिसाळ, नितीन पोता, राजेश भागवत, मल्हारी वाव्हळ, नागेश वाव्हळ आदिंसह सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24