अहमदनगर मध्ये अवघ्या ७.५० लाखांमध्ये फ्लॅट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

केडगाव :- परवडणाऱ्या दरात सर्व सुखसोयींनी सुसज्ज हक्काचे घर असावे असे मनोमन वाटणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करणारा १ बीएचके फ्लॅटचा स्वप्नपूर्ती हा अतिभव्य गृहप्रकल्प केडगाव-कल्याण लिंकरोडवर साकारला जात आहे. स्वप्नपूर्ती साकारणारे ‘शुभवास्तू रियल्टी’ फर्म क्रेडाई अहमदनगरचे सदस्य आहे.

या आठ बिल्डिंगच्या गृहप्रकल्पातील चार बिल्डिंगमधील फ्लॅटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित चार बिल्डिंगमधील फ्लॅटसाठी गुरुवार, २४ ते २८ ऑक्टोबरपर्यंत दीपावलीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत ग्राहक स्वागत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अवघ्या ७.५० लाखांत हक्काच्या घराची मालकी या प्रकल्पात मिळणार आहे. ग्राहकांना विविध बँका, फायनान्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना २.६७ लाखांची सबसिडीही मिळू शकते.

या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट तयार आहे. धनत्रयोदशीपासून आयोजित ग्राहक मेळाव्यात प्रत्यक्ष फ्लॅट पाहून दर्जा व गुणवत्तेची खात्री ग्राहकांना करता येणार आहे. ग्राहकांना येथे कर्ज प्रकरणाविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. लिंकरोडवर आयएमए भवनच्या पुढे असलेला स्वप्रपूर्ती गृहप्रकल्प अनेक अर्थांनी हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करणारा आहे.

दीपावलीच्या उत्सवी वातावरणात धनत्रयोदशीच्या मुहूर्तापासून ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या घराचे दरवाजे उघडणाऱ्या या ग्राहक मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शुभवास्तू रियल्टीचे प्रवर्तक सतीश पागा, संजय गुगळे, प्रकाश मेहता, राहुल पितळे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24