देणार्यांचे हात हजारो ….. ची अनुभूती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर – लॉक डाउन च्या काळात अनेकांना अत्यंत अत्यंत बिकट परिस्थितून जावे लागत आहे तर अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे मात्र याच काळात अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे आल्याने काहींची घडणारी उपासमार थांबली आहे यात घर घर लंघर सेवा,

खान्देश युवा मंच आणि हेलपिंग हॅन्ड्स फौंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने अनेक कुटुंबांना १ महिना पुरेल इतका शिधा दिला आहे.तर ज्यांना मोफत अन्न घेणं अपराधीपणाचे वाटते त्यांच्या साठी शिवभोजन आहेच.याशिवायही अनेक संस्था ,व्यक्ती लोकडाऊन च्य काळात गरजूंसाठी धावून आल्याने लोकडाऊनचा हा कालावधी काहीसा सुसह्य झाल्याचे पाहायला मिळते.

एकट्या घर घर लंगर सेवा या शीख पंजाबी समाज ,लायन्स इंटरनॅशनल ,जैन ,गुजराथी,सिंधी समाज आणि अहमदनगर पोलीस अशा अनेक संस्थामिळून सुरू करण्यात आलेल्या या सेवेने आजतागायत १ लाख ३९ हजार ५०० नागरिकांना भोजन पुरविण्यात आले.

तर दि. २१ रोजी ६,४०० नागरिकांना अन्न पुरविले ,त्यांनी केलेल्या मदती मुळे अनेकांना लोकडाऊनचा काळ सुसह्य पणे काढता आला . या शिवाय शहरातील दात्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड – १९ या खात्यात निधी साठी रक्कम जमा करण्यास सुरवात केली आहे.

अहमदनगर मोटर वाहन मालक , चालक , प्रतिनिधी संघटना आणि मोटर ड्रायविंग स्कुल संघटनेच्या वतीने ५१,००० चा धनादेश जमा करण्यात आला जय बोगावात , दिलीप कुलकर्णी , रवी जोशी , भैया सूर्यवंशी यांनी उपपरिवहन निरीक्षक धायगुडे यांच्या कडे धनादेश सुपूर्द करून शासनातर्फे महामारी रोखण्यासाठी सुरु असलेल्या शासनाच्या जोरदार प्रयत्नांना जोरदार यश येईल अशी सदिच्छाही व्यक्त केली

आहे तर अनेक व्यक्ती,संस्था, आस्थापनांनी ऑनलाईन पद्धतीने तसेच बँकांमध्ये निधी जमा करण्यास सुरवात केली असून या निधी साठी दिली जाणारी रक्कम हि कर सवलत पात्र असेल. एकूणच कोरोना सारख्या महामारीशी लढताना डॉक्टर्स, पॅरामेडिकल फोर्सेस , पोलीस व अन्य सर्व घटकांनी एकत्र येऊन हि लढाई सुरु ठेवली आहे तर या सर्व सामाजिक संघटनांनी गरजवंतांना रसद पूवुन आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देऊन देणार्यांचे हात हजारो हेच सिद्ध केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24