लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचे सहा विद्यार्थी मंथन प्रज्ञा शोधमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविला आहे.
मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यासह राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

गुणवत्तेची परंपरा कायम राखत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरी मधील स्पर्श झावरे राज्यात पहिली, आयुष फाटक राज्यात दुसरा, तन्वी आव्हाड राज्यात तिसरी, सुरभी मोकाशी राज्यात सातवी, सत्यजीत नाबगे राज्यात सातवा, इयत्ता तीसरी मधील यशराज मोरे राज्यात सातवा क्रमांक पटकाविला आहे.

या विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, निरीक्षक संजय नागपूरे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी अभिनंदन केले.

या गुणवंत विद्यार्थ्यांना मिनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदवडे, बाबा शिंदे, राजेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24