कष्टकरी कामगारांसह लेकराबाळांच्या चेह-यावर दिसला भाकरीचा आनंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील सावेडीनाका येथील आदिवासी वस्ती असलेल्या विट, वाळू लोडींग अन्लोडींग करणारे कष्टकरी कामगारांची वसाहत असुन या असंघटीत कामगारांची सरकार दरबारी कुठलीच कामगार म्हणून नोंद नाही. कारण शासकीय जिआरमधे संदिग्धता आहे. हे कामगार बांधकाममधेही नाहीत आणि माथाडीमधेही नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. यांची माथाडी कामगार किंवा बांधकाम कामगार म्हणून नोंद होण्यासाठी कामगार संघटना महासंघ आणि क्रांतिसिंह कामगार संघटना शासकिय स्तरावर प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.

या दुर्लक्षित असंघटीत कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर हे प्रयत्नशिल आहेत. कोरोना गटातील कोविड १९ या रोगाने जगभरातच नव्हे तर भारतातही थैमान घातले आहे. नियंत्रणासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन सुरू केलेला आहे. या सरकारी लॉकडाऊनमुळे गरीब, कष्टकरी, आदिवासी आणि असंघटीत माणसांचा रोजगार बुडाला आहे. शाळेला सुट्ट्या दिल्याने मुलांचा हक्काचा पोषण आहारही बंद झालेला आहे.

त्यामुळे गरीबांचा भाकरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या गंभीर संकटाचा विचार करून अखिल भारतीय नौजवान सभा ( AIYF ) आणि लोकरंग परिवार यांनी संवेदनशिल नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत पुणे, मुंबई, औरंगाबाद सह शहरातील डॉक्टर, सरकारी अधिकारी, बांधकाम व्यवसायिक, बँक कर्मचारी, एमआयडीसी कामगारांसह सर्वसामान्य माणसांनी मदतीचा हात दिला. या मदतीमधून आज रोजी ६८ कुटुंबांना अंदाजे २५० कष्टक-यांना किराणा सुपुर्द केला. घरपोच किराणा मिळाल्याचे पाहून कष्टकरी कामगारांसह लेकराबाळांच्या चेह-यावर भाकरीचा आनंद दिसला.

या मोहिमेसाठी एआयवायएफचे जिल्हाध्यक्ष दिपकराव शिरसाठ, अमोल चेमटे, चंद्रकांत माळी, रावसाहेब कर्पे, कार्तिक पासलकर, तुषार सोनवणे, अरूण थिटे, विजय केदारे, संतोष गायकवाड, सुनिल ठाकरे, सिटू कामगार संघटनेचे लहूजी लोणकर, महादेव पालवे, कुशिनाथ कुळधरण, महेंद्र नाईक, योगेश महाजन, बापू बनकर, कैलास माळी, नारायण पवार, लोकरंग परिवाराचे सचिन चोभे, महादेव गवळी, एआयवायएफचे राज्य कौन्सिल सदस्य रामदास वागस्कर, एआयवायएफचे राज्य सचिव संतोष खोडदे, कामगार संघटना महासंघाचे प्रा.डॉ.महेबुब सय्यद, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे दत्ताभाऊ वडवणीकर, दिपक नेटके, भैरवनाथ वाकळे आदींनी प्रयत्न केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24