अहमदनगर लाईव्ह 24 टीम : प्रजासत्ताक या सुवर्ण दिना दिवशी “एव्हरेस्ट हेल्थकेयर फाउंडेशन,शहांजापूर” यांच्या स्थापनेनिमित्त फाउंडेशन मार्फत व साई एशियन हॉस्पिटल ,आनंदऋषीजी नेत्रालय, ब्लडबँक,हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विध्यामाने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य आरोग्य शिबिराचे उदघाटन मा.आ निलेशजी लंके यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, गणेश शेळके (सभापती पं.स पारनेर) , हृदयरोग तज्ञ डॉ.महेश जरे ,आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी गुंजाळ , डॉ.विद्या बारवकर, राहुल पाटील शिंदे,(अध्यक्ष अण्णा हजारे युवा मंच) , सुखदेव पवार हे उपस्थित होते.
तसेच आनंदऋषीजी ब्लड बँक चे डॉ.शंकर मोरे, डॉ. शशिकांत शेळके, डॉ. सुरेखा पालवे,शहजापूरचे सरपंच संगीत मोटे आणि आनंदऋषीजी नेत्रालायचे डॉ. विजय भालेराव ओंकार वाघमारे,वैष्णवी जरबंडी,प्रगती लोणारे रामदास माने,तसेच हेल्थ फिटनेस चे डॉ. राहुल डाग,पूजा येणारे,संजय येणारे,विश्वनाथ दिवटे व त्यांचे सहकारी आणि गावातील सर्व ग्रामस्थ व पत्रकार मार्तंड बुचुडे, शिवाजी पानमंद,सुरेंद्र शिंदे, आण्णा मोटे, संजय शिंदे, बबन गवळी यांच्या उपस्थितीत एव्हरेस्ट हेल्थकेयर फाउंडेशन व भव्य आरोग्य शिबीराचा उदघाटन समारंभ पार पडला.
या शिबिराचा शहांजापूर व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची तपासणी झाली.तपासणी दरम्यान विविध प्रकारच्या आजाराचे रुग्ण अडुळून आले त्यामध्ये मोतिबिंदु ,ब्लड प्रेशर, शुगर, हे आजार प्रामुख्याने अडुळून आले.
या रुग्णाच्या मोतीबिंदू शस्रक्रिया अत्यल्प दरामध्ये करून घेण्याचा संकल्प एव्हरेस्ट हेल्थकेअर फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक मोटे व फाउंडेशनचे सदस्य यांनी केला आहे.
कार्यक्रम व भव्यशिबीर यशस्वी करण्यासाठी विशाल मोहळकर, बबलू म्हस्के,पोलिस व आर्मी स्टाफ,युवाशक्ती शहजापूर या सर्वांनी अथक परीश्रम घेतले.