अहमदनगरमध्ये मराठा उद्योजकांचा उद्या मेळावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर : संपुर्ण भारत देशातील मराठा व्यावसायिक व उद्योजकांना एकत्र आणत सुरु करण्यात आलेल्या मराठा उद्योजक लॉबीच्यावतीने उद्या मंगळवार दि.१९ रोजी शहरातील साई मुरली लॉन्स येथे मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती एम.यु.एल.चे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी राजेंद्र अवताडे, अशोक कुटे, किशोर मरकड, संदीप खरमाळे, उदय थोरात आदी उपस्थित होते. यावेळी श्री. बढे म्हणाले की, मराठा उद्योजक लॉबी नावाचे रोपटे तीन वर्षांपूर्वी लावण्यात आले होते.
त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून, प्रत्येक जिल्ह्यातून नव्हे तर भारतभरातून मराठा व्यवसायिक बांधव आपल्या एम.यु.एल. परिवारात सामील होऊन उद्योग व व्यवसायात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
सक्षम मराठा, सक्षम उद्योजक या उक्तीप्रमाणे मराठा बांधवांचे व्यवसाय व त्यांच्या व्यवसायाला नवी उंची प्राप्त करुन देण्यासाठी सवेगवेगळ्या स्तरातील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह संपुर्ण भारतातून तसेच विदेशातून ही मराठा व्यावसायिक बांधव यावेळी उपस्थित राहणार असून, या मेळाव्यास मराठा बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे शुभारंभ पोपटराव पवार यांच्या हस्ते होऊन, व्यवसायाचे मानसशास्त्र, व्यवसायातील संधी व व्यवसायाचे आर्थिक नियोजन अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. तसेच जवानांच्या कुटुंबियांना मराठा योद्धा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24