बचत गटांसाठी 27 नोव्हेंबरला कार्यशाळा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : बचत गट स्थापन करून महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किंवा असे गट स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या महिला भगिनी व शेतकरी बांधवांसाठी लोकरंग फाउंडेशन संस्थेने दि. 27 नोव्हेंबर, 2019 रोजी (बुधवार) एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

 

थेट शेतमाल विक्री, ऑनलाईन मार्केटिंग व अन्नपदार्थ पॅकेजिंग उद्योगमधील संधी यावर या प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.

 

याबाबत अधिक माहिती देताना लोकरंग फाउंडेशन (बाबुर्डी बेंद, ता./जि. अहमदनगर) संस्थेच्या अध्यक्षा माधुरी चोभे यांनी सांगितले की, लोकरंग कृषी व ग्रामीण विकास मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे शेतकरी व महिला सक्षमीकरण चळवळ हाती घेण्यात आली आहे.

 

त्यानुसार बायोमी टेक्नॉलॉजीज (केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, अहमदनगर) येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत दि. 27 नोव्हेंबर रोजी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

 

या प्रशिक्षणात बचत गट चळवळीसमोरील संधी व आव्हाने, थेट शेतमाल विक्रीमधील संधी व आव्हाने, उन्हाळी पदार्थांची निर्मिती व विक्री, फूड प्रोसेसिंगमधील सद्यस्थिती व संधी, फूड पॅकेजिंगमध्ये आकर्षकपणाची गरज, व्यावसायिकता व ग्राहकाभिमुखता, ऑनलाईन मार्केटिंगची गरज, संधी व आव्हाने, मार्केटिंग टाय-अप आणि करार पद्धती आदी विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी अगोदरच नावनोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना सर्टिफिकेट आणि नोट्स मिळतील. अधिक माहितीसाठी लोकरंग कृषी व ग्रामीण विकास मार्गदर्शन केंद्राच्या 9673477725 किंवा 9422462003 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लोकरंग फाउंडेशनने केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24