बातमी कामाची ! तुमचे मतदान कार्ड हरवल आहे का ? डुप्लिकेट वोटर आयडी कार्ड कसे बनवणार जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter ID Card : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे सध्या निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत. महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात मात्र राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की लगेचच आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे.

लोकसभेसाठी उमेदवार फायनल केले जात आहेत. याशिवाय विधानसभेसाठी देखील आत्तापासूनच चाचपणी केली जात आहे. राज्यातील सर्व क्षत्रिय पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सक्रिय झाले आहेत. भावी उमेदवारांनी देखील आता जनसंपर्क वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. एकंदरीत आता राजकीय पुढार्‍यांची दोरी मतदार राजांकडे आलेली आहे. लवकरच देशात सर्वत्र मतदानाचे सत्र सुरू होणार आहे. दरम्यान मतदानासाठी मतदान कार्ड लागणार आहे.

मात्र अनेकांनी अजून मतदान कार्ड बनवलेले नाही. यामुळे ज्या तरुणांचे अठरा वर्षे वय पूर्ण झालेले असेल त्यांनी लवकरात लवकर मतदान कार्ड बनवून घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे काही लोकांचे मतदान कार्ड हरवलेले आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून मतदान कार्ड हरवल्यास डुप्लिकेट मतदान कार्ड कसे काढायचे? हा सवाल उपस्थित केला जात होता.

अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डुप्लिकेट मतदान कार्ड बनवण्याची सविस्तर प्रोसेस समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. खरे तर डुप्लिकेट मतदान कार्ड बनवण्यासाठी आता कोणत्याच शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाही. नागरिकांना ऑनलाइन डुप्लिकेट मतदान कार्ड साठी अर्ज करता येतो.

कसा करणार ऑनलाईन अर्ज ?

डुप्लिकेट मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर जाऊन EPIC-002 फॉर्म डाउनलोड करावा लागेल. आता फॉर्म योग्यरित्या भरावा लागेल आणि सोबत सर्व कागदपत्रे जोडावी लागतील. फॉर्ममध्ये, तुम्हाला डुप्लिकेट मतदार कार्ड बनवण्याचे कारण देखील द्यावे लागेल आणि जर मतदार कार्ड चोरीला गेले असेल तर तुम्हाला एफआयआरची प्रत देखील जोडावी लागेल.

सर्वकाही केल्यानंतर, तुमच्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे फॉर्म सबमिट करा. तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल. या क्रमांकाद्वारे तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा अर्ज तपासू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. पडताळणीनंतर तुम्हाला कळवले जाईल आणि त्यानंतर तुम्ही स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन ते मिळवू शकता.