भाच्याचे कारस्थान मामीने केले उघड; पितळ उघड पडताच आरोपी फरार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मामाकडून पैसे न मिळाल्यामुळे रागातून भाच्याने मामाविरुद्ध कट रचला अन तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे गाठले. मात्र भाच्याचे बिंग मामीने उघडकीस आणले.

दरम्यान हा प्रकार कर्जात तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा कर्जत रोडवर दूरगाव फाटा येथे दोन अज्ञात मोटारसायकल स्वरांनी आरोपी सागर निंभोरे याला आडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करून

त्याच्याजवळील १ लाख रुपये व मोबाईल चोरल्याची तक्रार सागर निंभोरे याने २७ मे रोजी कर्जत पोलिसांत दिली होती.

निंभोरे याने त्याचा मामा पोपट दरेकर यांनीच आपल्याला लुटले असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन खात्री करण्यास व शोध घेण्यास कर्मचारीवर्ग यांना पाठविले होते.

पोलिसांनी चौकशी करत असताना समजले कि, निंभोरे याचे मामा पोपट दरेकर व त्यांचा मुलगा दीपक यांच्याबरोबर निंभोरे याचा वाद झाले. निंभोरे यास पोपट दरेकर यांच्या घरी घेऊन पोलीस गेले असता त्याची मामी नंदाबाई दरेकर यांनी निंभोरे याचे बिंग फोडले.

निंभोरे याने पोपट दरेकर यांचा मतीमंद मुलगा दीपक यास मारहाण केली. निंभोरे याचा मोबाईल दीपक दरेकर याने चोरल्याचा कांगावा करीत घराची झडती घेतली. असे सांगत नंदाबाई दरेकर यांनी दीपक यास निंभोरे याने मारहाण केल्याची जखम दाखवली.

आपला भांडाफोड झाल्याचे लक्षात येताच सागर निंभोरे याने तेथून धूम ठोकली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात सागर निंभोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24