Ahmednagar News : माजी आ. निलेश लंके हे त्यांच्या विविध कृतींसाठी व वेळेला मदतीला धावून जाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या अनेक घटना अनेकदा चर्चेच्या विषय झालेल्या. दरम्यान वैष्णोदेवी येथे ते नेहमीच दर्शनासाठी जात असतात.
आता ते लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दर्शनाला गेले आहेत. तेथे झालेली एक घटना आता चर्चेचा विषय झाली आहे. त्यांची संकटात धावून जाण्याची वृत्ती व सामाजिक बांधिकली जम्मूमध्येही पहावयास मिळाली.
नीलेश लंके हे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले असता रविवारी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी औरंगाबाद येथील देवी भक्त नवनाथ नाथा कोळसे देवीच्या दर्शनास निघालेले होते. परंतु त्यांना अचानक चक्कर आली व ते कोसळले.
त्याच वेळी नीलेश लंके व त्यांचे सहकारी तिथे पोहोचत त्यांनी तात्काळ रूग्णवाहिकेची सोय करून चार किलोमीटर अंतरावरील रूग्णालयात नेत प्राथमिक उपचार केले. त्यातंर त्यांना पुढे कटारा येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले.
डॉक्टरांशी कोळसे यांच्या प्रकृतीविषयी चर्चा करत कोळसे यांच्या नातलगांशी संपर्क करून झालेल्या घटनेची माहिती लंके यांनी दिली. कोळसे यांच्यावर उपचार सुरू झाल्यानंतर लंके हे पुढील प्रवासासाठी गेले.
लंके हे नेहमीच वैष्णादेवीच्या दर्शनासाठी कटारा येथे जात असल्याने त्यांचा तेथे संपर्क आहे. तेथील संपर्कामुळेच कोळसे हे चक्कर येउन पडल्यानंतर तातडीने इतर गोष्टी मिळण्यास मदत झाली असे त्याच्यासोबतच लोक सांगतात.
नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोळसे हे चक्कर येऊन पडल्यानंतर जी तातडीने कार्यवाही केली व उपचार सुरु करून दिले त्यामुळे लंके व त्यांच्या सहकाऱ्यांचे कोळसे यांच्यासह त्यांच्या नातलगांनी आभार मानले.
एखादी व्यक्ती संकटात असेल व मी कुठेही असलो तरी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जातो. संकटात सापडलेल्या, आडलेल्या व्यक्तींना मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो अशी प्रतिक्रिया माजी आ. निलेश लंके यांनी दिली.