नितीन गडकरी म्हणाले आम्हाला लाज वाटली पाहिजे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण सोहळा पार पडला.

या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं.

पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दूग्धोत्पादनाचं यावेळी गडकरींनी कौतुक केलं. एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जितकं दूध संकलित होतं, तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले.

एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध संकलित होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही.

पण सुनील केदार आणि मला वाटते. आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. त्यामुळे तो आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.