अहमदनगर बातम्या

श्रीगोंद्यातल्या आढळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच-उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव !

Published by
Ahmednagarlive24 Office

श्रीगोंदा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्याविरुद्ध दहा सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करण्यासह उपसरपंचाच्या पतीचा कारभारात हस्तक्षेप या सारख्या कारणांमुळे दि.५ रोजी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंच व उपसरपंच यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे श्रीगोंद्याच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे

तालुक्यातील आढळगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ रोजी पार पडली होती. ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंचासह १३ जणांची सदस्य संख्या असून, सरपंच शिवप्रसाद उबाळे व महिला उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्यावर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत.

बैठका वेळेवर घेत नाहीत. ग्रामपंचायतीचे कामकाज सदस्यांसमक्ष होत नाही असा ठपका ठेवण्यात आला. तसेच पदाधिकारी मनमानी कारभार करतात. उपसरपंच महिला असून, त्यांचे पती ग्रामपंचायतीचा सर्व कारभार पाहतात.

या कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत, देवराव वाकडे, अविनाश मिसाळ, मनोहर शिंदे, अंजली चव्हाण, सीमा बोडखे, रोहिणी काळाणे, लक्ष्मी शिंदे, नितीन गव्हाणे, शालन गिरमकर या दहा जणांनी अविश्वास ठराव दाखल केला. दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर दहा सदस्यांच्या सह्या आहेत. सरपंच व उपसरपंच यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ahmednagarlive24 Office