अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : दमदार पाऊस नाही, आवर्तन नाही ! शेती करणे अवघड

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने शनिशिंगनापूर व सोनई परिसरात दडी मारल्याने मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी संघटने उपाध्यक्ष अमृत गडाख यांनी केली आहे.

या परिसरातील शिरेगाव, पानसवाडी, धनगरवाडी, लोहोगाव, घोडेगाव, आदी गावात कापुस, ऊस, सोयाबीन, आदी पिके मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत लाभक्षेत्रातील पिके पाऊस नसल्याने सुकू लागली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. परिणामी, जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाची प्रतीक्षा सर्वाना लागली असून नाजिकच्या काळात पाऊस पडला नाही तर हातातुन पिके जाण्याची भिती आहे. झालेला खर्च मातीत जातो की काय? अशी चिंता शेतकऱ्याना चिंता सत्तावित असून शेतकरी संकटात सापडला आहे.

दमदार पाऊस नाही, आवर्तन नाही. त्यामुळे विहिरिची व भुजल पातळी खोलवर गेली आहे. परिणामी, शेती करणे अवघड बनले आहे. अनेक संकटना शेतकरी समोरे जात आहे.

दरम्यान, यावर्षी पावसाळ्यात ऊस, कापुस, सोयाबीन पिकांना पाण्याची खूप गरज आहे. मागील वर्षीचे वाचलेले धराणातील चार टिमसी पाणी त्यातून तातडीने मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडावे, अशी मागणी उपाध्यक्ष शेतकरी संघटनेचे अमृत गडाख यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office