मानधन नको वेतन हवे… आशा सेविकांचा तहसीलवर मोर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेहवगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी पंचायत समितीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेवगाव शहरातील बाजारपेठेतून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

त्यानंतर मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदार सी. एम. वाघ, आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर यांना दिले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालय येथे तहसीलदार सी.एम. वाघ यांना निवेदन देण्यात आले.

आशा व गटप्रवर्तक तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, किमान वेतन २१ हजार रुपये मिळावे, मानधन नको वेतन हवे,

आशा व गटप्रवर्तकांना जुलैपासून लागू केलेली मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता दरमहा वेळेवर देण्यात यावा, जुलै महिन्यापासूनचे थकीत वाढीव मानधन फरकासह ताबडतोब द्यावे, सर्व योजना कर्मचारी यांना कायम सेवेत सामावून घेतले जावे आदी मागण्या केल्या.

दरम्यान या आंदोलनप्रसंगी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष लांडे, तालुका अध्यक्ष कॉ. संजय नांगरे, बापूराव राशीनकर, वैभव शिंदे, गहिनीनाथ आव्हाड, आशा व गटप्रवर्तक संध्या पोटफोडे,

अंजली भुजबळ, सुनेत्रा महाजन, वैशाली झिरपे, वैशाली देशमुख, गीतांजली सोनवणे, प्रतिभा सातपुते, नीता शिनगारे, निशा जमदाडे, शोभा पंडित, सुवर्णा देशमुख, शोभा चव्हाण यांच्यासह तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.