अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- सर्वसामान्य, गोर-गरीबांना लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने करोनाच्या महामारीत उपासमारीची वेळ आली आहे. गावातील पुढाऱ्यांनी गटातटाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून
या महामारीत एकमेकांना माणुसकीच्या धर्माने कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले.
तालुक्यातील तीन ठिकाणी मोफत अन्नछत्राचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेवणाच्या पाकिटांचे वाटप सुरू करण्यात आले. यावेळी आ. विखे बोलत होते.
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रोज अन्नदान होणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांनी सांगितले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने मुळा प्रवरा वीज वितरण संस्थेच्या माध्यमातून तीन ठिकाणी अन्नक्षेत्र सुरू करण्यात आले आहे.
संगमनेर रोडवरील शुभम मंगल कार्यालय, पुणतांबा रस्त्यावर भैरवनाथनगर येथील डावखर लॉन्स तसेच हरेगाव येथील बेलापूर कंपनीच्या शाळेत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.
जवळपास असलेल्या गावांमध्ये जेवनाचे पॅकेट पुरवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे उद्या बेलापूर येथे व निपाणीवाडगाव अशोकनगर येथे अन्नक्षेत्र सुरू करण्यात येणार आहे, असे आ. विखे पाटील जाहीर केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®