जनावरांना टॅगिंग नाही ? बाजार समितीत ‘नो एंट्री’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  सध्या जनावरांत विविध आजारांचा संसर्ग होत आहे. लाळ्या खुरकूत व सांसर्गिक गर्भपात यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

यासाठी राहाता पंचायत समितीच्यावतीने व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक गावात लसीकरण मोेहीम सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एनएडीसीपी अंतर्गत हे राबविले जात आहे. संसर्गजन्य लाळ्या खुरकूत व सांसर्गिक गर्भपातत्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांच्या कानाला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून टॅगिंग करून घ्यावे.

ज्या शेतकर्‍यांच्या जनावरांना टॅगिंग नसेल त्यांना आपली जनावरे बाजार समितीत खरेदी विक्रीसाठी बंदी असणार असल्याची माहिती राहाता पंचायत समितीच्या सभापती नंदाताई तांबे यांनी दिली आहे.

राहाता तालुक्यात 79 हजार 410 पशुधन आहे. तालुक्यातील 13 पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत सप्टेंबरपासून लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण सुरू केले आहे.

तालुक्यातील सर्व जनावरांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक जनावराच्या कानात टॅग मारून ते शासनाच्या अधिकृत प्रणालीवर ऑनलाईन करूनच लसिकरण करण्यात येणार आहे.

जनावरांना टॅग मारल्यानंतर काही पशुपालक ते काढून टाकतात. या तक्रारीनंतर अशा जनावरांना बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीसाठी बंदी घालण्यात येईल,

तसेच पशुप्रदर्शन व कर्ज प्रकरणातून ही जनावरे वगळण्यात येतील. अशा शेतकर्‍यांना इतरही योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24