पिचड यांच्या आंदोलनाची दखल; आजपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरु होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे डांबराने तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्या दालनात ठिय्या दिला.

त्यावर आज बुधवारपासून तात्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. दिपावली सणासुदीच्या काळात लोकांची संगमनेर-अकोले रस्त्यावर जास्त वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहे.अनेकांच्या दुचाकी खड्ड्यात आदळून अथवा सरकून अपघातही झालेले आहेत.

रस्त्यावर निकृष्ट दर्जाचा मुरुम व माती टाकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचा फुपाटा होतो. ठेकेदार व सार्वजनिक विभाग जनतेच्या जिवाशी खेळत आहे. तेव्हा तात्काळ अकोले-संगमनेर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व या रस्त्यावरील विद्युत पोलचे शिफ्टींग करावे, अशी मागणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांनी अकोले- संगमनेर रस्त्यावरील खड्डे आजपासून बुजविण्याचे काम सुरु होईल, असे आश्वासन देत संबंधित ठेकेदाराला फोनवर तशा सूचनाही केल्या. अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी राजमार्ग प्रश्नासंदर्भात केलेल्या

आंदोलनात माजी आ.वैभवराव पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संगमनेर यांच्या दालनात भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,

अकोलेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशराम शेळके, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, चंद्रकांत घुले, शंभू नेहे, राहुल देशमुख, विजय पवार, हितेश कुंभार, ज्ञानदेव निसाळ, मोईन शेख आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24