अतिरिक्त रक्कम घेतल्याने त्या 3 कोविड सेंटरला धाडल्या नोटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांची तपासणी लवकरात लवकर व्हावी यासाठी जिल्हाभर कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. दरम्यान काही कोविड सेंटर मध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा धक्कादायक जिल्ह्यातील जामखेड या तालुक्यात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेले एक हॉस्पिटल व इतर दोन खासगी हॉस्पिटल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून घेऊन उपचार करीत आहेत.

कोविड रूग्णांच्या तक्रारीवरुन भरारी पथकाने या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. या रुग्णालयात कोविड रूग्णांवर मोफत उपचार करताना जामखेड शहर व तालुक्यातील कोवीड रूग्णांना या हॉस्पिटलने लाखो रुपये ज्यादा उकळले आहेत. याबाबतच्या तोंडी व लेखी तक्रारी रूग्णांच्या नातेवाईकांनी,

राजकीय पक्ष व विविध संघटनांनी भरारी पथकाकडे केल्या आहेत. सदर हॉस्पिटलची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भरारी पथकाचे प्रमुख परशुराम कोकणी यांनी पाहणी करून खातरजमा केली आहे. यामुळे सदर रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24