अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- नुकतेच पन्हाळगडाजवळील पावनगडावर खोदकाम करत असताना पुरातन काळातील तोफगोळे सापडले होते.
नगर जिल्ह्यातील ऐतिहासीक महत्व असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्यातील उत्खनन करताना जुन्या काळातील तोफगोळे सापडले आहेत. या बाबत माहिती अशी की, खर्डा येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात महाराष्ट्र शासन व पुरातत्व विभाग नाशिक यांच्या वतीने दुरूस्तीचे काम सुरू आहे.
त्याकरिता खर्डा येथील किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना पुरातन काळातील तोफगोळ्यतील सुमारे १५० गोळे सापडले आहेत. हे तोफगोळे सापडल्यामुळे इतिहास प्रेमीमध्ये एक मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. याबाबत खर्डा शहर व परिसरातील अनेक लोकांनी खर्ड्याच्या किल्ल्याला भेट देऊन या सापडलेल्या तोफातील गोळ्यांची पाहणी केली असता हे हे तोफगोल्यातील गोळे गोल आकाराचे दिसून आले.
याबाबत जामखेड तालुक्यातील अनेक लोकांनी खर्ड्याच्या किल्ल्याकडे धाव घेतली. अनेक इतिहासप्रेमींना या गोळ्यांविषयी मोठे आशादायी चित्र निर्माण झाले आहे,मराठ्यांच्या शेवटचा विजय म्हणून ओळख असणाऱ्या खर्डा किल्याचे सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू आहे
अनेक वर्षांनी काम होत असल्याने शिर्डी, हैद्राबाद राज्यमार्गावर असणारे खर्डा शहर व किल्याला अनेक पर्यटक भेट देत आहेत. शासनाने या सापडलेल्या तोफगोळ्यांच्या संदर्भात इतिहास कालीन जपलेल्या संग्रहालयात याचं जतन करावं अशी मागणी खर्डा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.