अहमदनगर बातम्या

आता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News:नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता राज्यातील सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी, पूर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.सध्या ज्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे, त्या सुरू राहणार आहेत. नव्याने निवडणुका जाहीर केल्या जाणार नाहीत.

नगर जिल्ह्यात पहिल्या टप्यात अनेक साखर कारखान्यांच्या आणि त्या आधी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र आता दुसऱ्या ट्प्यातील अशा संस्थांच्या निवडणुकांना राज्यातच ब्रेक लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office