अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-साईंच्या दरबारात ड्रेसकोड असावा, असा नियम जाहीर करण्यात आला होता. त्यावरून वादंग उठले आहे. अशातच साई दरबारानंतर सरकार दरबारीही काम करणाऱ्यांनाही आता ड्रेसकोडचे बंधन घालण्यात आले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत,याबाबतचे निर्देश राज्य सरकारने आज जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल असे कपडे घालत नाहीत.
त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल
तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावरही होत असतो. या सगळ्या बाबी विचारात घेऊन मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना