आता बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍यांसोबत डीवायएसपी करणार ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- अवैध वाळू उपसा, वाळू वहातूक, वाळू माफिया हे शब्द जिल्ह्याला काही नवीन राहिले नाही. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि त्यावरील कारवाई असे प्रकार बऱ्याचदा घडलेले आहेत.

या लोकांशी महसूल मधील काही लोकांचे लागेबांधे असल्याचे आरोप अनेकदा केले जातात व त्यातूनच हे वाळू तस्कर आणखीनच आपला व्यवसाय वाढवत जातात असे नागरिकांमधून बऱ्याचदा बोलले जाते. परंतु आता कर्जत येथे नव्याने हजर झालेले डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी या विरुद्ध मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. कर्जत श्रीगोंदा व जामखेड तिन्ही तालुक्यातील वाळू माफियांना मोका लावणार असून बेकायदेशीर वाळू उपसा कोणी करत असेल

तर तो बंद करावा, असा इशारा डीवायएसपी जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. कर्जत, श्रीगोंदा व जामखेड या तिन्ही तालुक्यांमध्ये भीमा सीना यासह सर्व नदी पात्रांमधून बेकायदेशीर मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा सुरू आहे या पार्श्वभूमीवर बोलताना डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी वाळू माफिया सर्वच गुन्हेगारी क्षेत्राला इशारा देताना सांगितले आहे की यापुढे उपविभागामध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

वाळू माफियांना प्रसंगी मोका लावणार परंतु कोणालाही सोडणार नाही जर कोणी वाळूउपसा करीत असेल तर तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असे खुले आव्हान डी. वाय. एस. पी. जाधव यांनी दिले आहे. तसेच सर्वसामान्य माणसाला पोलीस विभागाविषयी आदर आहे आणि त्यांना सुरक्षा देताना त्यांच्या मनात पोलीस विभागाविषयी भरवसा निर्माण करणार आहोत.यासाठी कर्जत श्रीगोंदा आणि जामखेड या तिन्ही तालुक्यांत नागरिकांसाठी सेल निर्माण करणार आहोत,

हा विभाग त्यांचे नेहमीचे काम करतानाच या विभागासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहोत. महिलांसाठी विशेष सुरक्षा उपविभागामध्ये महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यावर आपला भर राहणार आहे.यासाठी निर्भया पथक तयार करणार आहोत असेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24