अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-निवडणुका म्हटलं की सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातून रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना राबवण्याच्या यासंदर्भात मतदारांना विविध प्रकारचे आश्वासने देतात.
परंतु पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरनाम्याद्वारे पाच वर्षाच्या कार्यकाळात जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला,
तर होम हवन करून पाऊस देखील पाडू असे थेट आश्वासन दिल्याने मतदारांना देखील डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून विविध पॅनल मंडळा कडून मतदारांना जाहीरनाम्याच्या माध्यमातून विविध आश्वासने दिली जात आहेत.
रस्ते वीज पाणी घरकुल शौचालया सारखे विविध प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देणारे जाहीरनामे अनेक गावातून पाहण्यास मिळाले आहेत. मात्र शिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करडवाडी येथील
जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळात होम हवन करून गावात पाऊस देखील पाडला जाईल असे आश्वासन मतदारांना दिल्याने गावातील मतदारावर देखील डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे.