अहमदनगर बातम्या

आता अधिवेशनात विकासकामांऐवजी केवळ भ्रष्टाचार आणि हप्तेखोरीवरच चर्चा..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- पूर्वी अधिवेशनात मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होत असे मात्र आता मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होण्याऐवजी फक्त भ्रष्टाचार, हाप्तेखोरी, कुरघोडी, यावर चर्चा होते.

अडीच वर्षांत एकही योजना नाही. पीकविमा, अवकाळी अनुदान, अतिवृष्टी मदत नाही. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी सरकारवर केली.

त्या म्हणाल्या की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज, पाणी, रस्ते, महिलांचे प्रश्न, नोकरभरती, पीकविमा, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचे अनुदान आदी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी वाईन विक्रीसारखे अनेक चुकीचे निर्णय घेतले. वाईनविक्रीचा निर्णय तर महिलांसाठी अत्यंत दुर्दैवी असून, वेदनादायी आहे.

भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांना रोहित्र सहज मिळत होते, आता मात्र पैसे भरूनही रोहित्र मिळत नाही. सत्तेत असताना मोठा निधी मिळायचा, आता सत्तेत नसल्यामुळे निधी मिळविण्यासाठी अडचणी येतात.

त्यामुळे सध्या आपण सत्तेत असल्याचा व नसल्याचा अनुभव घेत असून, केंद्रात व राज्यात एकाच विचारांचे सरकार असले तर किती मोठे काम करता येते, हे आपण अनुभवले आहे.

जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो, यावर न बोललेलच बरं. आता निवडणुका येतील, त्याचबरोबर पाच वर्षे गायब असलेले विरोधकही येतील. पाच वर्षे कुठे गेला होतात, किती प्रश्न सोडविले, याचा त्यांना जाब विचारा. असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.

Ahmednagarlive24 Office